Shambhuraj Desai: महायुतीच्या तिन्ही पक्षप्रमुखांच्या निर्णयावर पालकमंत्रिपद अवलंबून - शंभूराज देसाई
एक-दोन दिवसात पालकमंत्री संदर्भात निर्णय घेतला जाईल- शंभूराज देसाई
शंभूराज देसाई म्हणाले की, शिवसेनेकडून आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांना दिले आहे. दोन दिवसात आम्ही मंत्रायलयात जाऊन आमच्या आमच्या पदाचा पदभार स्वीकारणार आहोत. आता माझं म्हणायला गेलो तर माझ्याकडे याआधी उत्पादन शुल्क विभाग होतं तसचं मी विद्यमान राज्य मंत्री होतो.
तर आता माझ्याकडे पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण हे तीन खाते आले आहेत आणि हे तिन्ही खाते माझ्यासाठी नवीन आहेत. या तिन्ही विभागाच्या वरिष्ठांसोबत बैठक घेऊ आणि खात समजून घेऊ त्याचसोबत कशाप्रकारे या खात्यात काम करता येईल ते समजून घेऊ. शिवसेनेचे सर्व मंत्री त्यांना जो विभाग मिळाला त्यामध्ये ते चांगलं काम करून दाखवतील. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि एक-दोन दिवसात पालकमंत्री संदर्भात निर्णय घेतला जाईल.
ठाणे पालकमंत्री
ठाणे पालकमंत्रींच्या संदर्भात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, याचा अंतिम निर्णय महायुतीचे पक्षप्रमुख जे आहेत ते तिघे मिळून घेतील. खाते वाटप होईपर्यंत चार दिवस याला हे खाते मिळणार त्याला ते खाते मिळणार अशा बातम्या सुरू होत्या. पण खात देत असताना समतोल राखण्यात आला आहे. जरा धीर धरा दोन दिवसात पालकमंत्री पदाचे खाते वाटप होईल आणि ते सगळ्यांनाच समजणार आहे.