तथ्यहीन वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल - शंभूराज देसाई

तथ्यहीन वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल - शंभूराज देसाई

आम्हाला कसलाही धोका नाही, आमचे 50 आमदार आणि 13 खासदारांनी मिळून नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडलेला आहे.

प्रशांत जगताप, सातारा

आम्हाला कसलाही धोका नाही, आमचे 50 आमदार आणि 13 खासदारांनी मिळून नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडलेला आहे. कोण भाजपच्या जवळ जात असेल याचा आमच्या महायुतीवर परिणाम होणार नाही. आमचे 185 च्या पुढे बहुमत जाईल. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. अजित दादांच्या बाबतीत दादाच सांगतील अथवा आमचे वरिष्ठ सांगतील. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात कसे टिकवायचे यासाठी आमचे प्राधान्य राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 50 आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत किती आमदार आहेत हे त्यांनी एकदा सांगावं असं.

खारघर प्रकरणामध्ये आम्ही आकडेवारी लपवत नाही. संजय राउताना काही काम नाही. राऊत एसी ऑफिसमध्ये बसून नुसतं बसतात. हवेतील गप्पा मारणाऱ्या राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही. राऊत यांची पोलीस चौकशी करतील,सरकारला बदनाम करणारे वक्तव्य राऊत यांनी केलं आहे,पोलीस तपास करतील असे शंभूराज देसाई यांनी सांगितलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com