Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarTeam Lokshahi

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास,राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित आहेत.

दरम्यान, मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून जात असताना पवार, फडणवीसांना म्हणाले, चला माझ्या सोबत, त्यानंतर फडणवीस पवारांच्या गाडीत बसले. दुसरीकडे लेडीज हॉस्टेलपासून कार्यक्रमाच्या स्थलापर्यंत पुन्हा एकाच गाडीतून प्रवास केला. राज्यातील राजकीय गदारोळात पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Pakisthan crisis: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गंभीर; खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com