Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad : "एक गुगली...२ विकेट पडणार"; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळं राजकीय चर्चांना उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अशातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळं खळबळ उडाली आहे.
Published by :

Jitendra Awhad Tweet : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्यानं शरद पवारांनी गड राखल्याची चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अशातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळं खळबळ उडाली आहे.

ट्वीटरवर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

एक गुगली...२ विकेट पडणार

क्या गेम

एक बॉल...दो विकेट

#महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्वीटमुळं अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. तसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे १० आमदार शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. १० आमदारांनी सुप्रिया सुळेंना संपर्क साधल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे १० आमदार अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com