Sharad Pawar
Sharad PawarAdmin

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. कोर्टानं ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळल्यानं आता कायदेशीर अभ्यास करून कोर्टात जाणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
Published on

विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. नुकतच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेण्यात आला. सोलापुरातील मारकडवाडी येथे ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने ही मागणी फेटाळली. काँग्रेस नेते राहुल गांधी मारकडवाडी येथे येणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. विरोधक प्रसिद्ध वकील अभिषेक मुनसिंघवी यांचा सल्ला घेणार आहेत. ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाई देण्याची विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. कोर्टानं ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळल्यानं आता कायदेशीर अभ्यास करून कोर्टात जाणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनी ईव्हीएमविरोधात कोर्टात जावं, त्यांच्या वकिलांचा खर्च आपण देऊ असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

आज विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे. विधीमंडळात पुढील दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यातच शपथविधी सुरु असताना विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले असून विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधकांनी शपथ घेतली नाही.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com