Sharad Pawar
Sharad Pawar Team Lokshahi

अजित पवार भाजपामध्ये जाणार? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले की...

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिला आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांबाबतच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावली नाही. सगळे सहकारी हे पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. असे शरद पवार म्हणाले.

यासोबतच शरद पवार पुढे म्हणाले की, ही केवळ तुमच्या मनातील चर्चा आहे. अजित पवारही पक्षाचे काम करत आहेत. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com