Sharad Pawar PC: शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी त्यांचे निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीयवर्तुळात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ तसेच एक सरळ साधे व्यक्तीमत्त्व आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रुपाने गमावल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गजांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा पिंड राजकारणी नव्हता- शरद पवार
याचपार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं आज ते आपल्यामध्ये नाही ही अस्वस्था आहे. त्यांचा पिंड हा राजकारणी नव्हता ते अर्थशास्त्रज्ञ होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य काय यासाठी विचार करण्याची भूमिका त्यांची होती. माझा आणि त्यांचा परिचय हा मुंबईत झाला होता.
एका चांगल्या व्यक्तीला आज देश मुकला- शरद पवार
मी मुख्यमंत्री होतो आणि त्याकाळामध्ये ते रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर होते. तेव्हा ते नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळात अर्थखात्याचे मंत्री होते आणि मझाकडे संरक्षण खातं होतं. देशाला त्या १० वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा मिळाली. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असताना, त्यांनी ती आर्थिक स्थिती सावरत स्वत: पंतप्रधान झाल्यानंतर भरीव भूमिका घेऊन देशाला वाचवले. एका चांगल्या व्यक्तीला आज देश मुकला मी माझा वतीने पक्षाच्या वतीने श्रद्धाजली अर्पण करतो