राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांसह परदेशात गेले होते. राज ठाकरे परदेश दौऱ्यावरुन परतले आहेत.

राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, "दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंद आहे. पण यावर भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही."

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज ठाण्यात तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com