राहुल गांधींच्या शिक्षेवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...
2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने काल (23 मार्चला) आपला निकाल दिला आहे. 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकात एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले होते, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्यात एक गोष्ट समान आहे. सर्वच चोरांची आडनावे मोदीच कशी ? असे राहुल गांधी म्हणाले होते.
न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. 2 वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वही धोक्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार ट्विट करुन म्हणाले की, भारतातील राजकीय पक्ष, नेते आणि नागरिकांचा आवाज दाबण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न ही गंभीर चिंतेची बाब आहे. असे शरद पवार म्हणाले.