Sharad Pawar : आज पुण्यात शरद पवारांची सभा

Sharad Pawar : आज पुण्यात शरद पवारांची सभा

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

आज पुण्यात शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेत पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेतून शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. वडगावशेरी मतदारसंघात शरद पवारांची ही सभा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com