Sharad Pawar
Sharad Pawarteam lokshahi

शिवसेनेपेक्षा मोदी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास अनुकूल होते; शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ मधून खुलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून सांगितला महाविकास आघाडी बनण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे या पुस्तकातून लिहिण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, शिवसेना आणि भाजप युतीतून लढल्यानंतर सरकार बनवताना शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार बनवता येईल का यासाठी भाजप प्रयत्न करत होता.२०१९च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, असे भाजपने सुरू केले होते. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती. असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता. मी या प्रक्रियेत सहभागी नव्हतो. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.आम्ही तुमच्याबरोबर यावे ही अपेक्षा कळत नकळत व्यक्त होत आहे. परंतु अशी राष्ट्रवादीची कोणत्याही प्रकारे इच्छा नसल्यानेच गैरसमज टाळण्याकरिता मी मुद्दाम भेटीला आलो आहे’ असे मी मोदींना स्पष्टपणे सांगितले होते. राजकीय संभ्रम राहू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घालायची असेही ठरले.मला या गोष्टी कळताच भाजपसोबत जाणे सोयीचे होणार नाही म्हणून मीच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना स्पष्ट नकार कळवला होता. अस शरद पवार यांनी पुस्तकात म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com