शरद पवार मारकडवाडी दौऱ्यावर; ग्रामस्थांच्या बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीवर चर्चा

शरद पवार मारकडवाडी दौऱ्यावर; ग्रामस्थांच्या बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीवर चर्चा

शरद पवार मारकडवाडी दौऱ्यावर; ग्रामस्थांच्या बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीवर चर्चा
Published by :
shweta walge
Published on

सोलापूरच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडीतील मतदान आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु प्रशासनाने याला विरोध केला. ग्रामस्थांनी निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या गावातून कमी मते कशी मिळाली याचा तपास करण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधीच पोलिसांनी जमावबंदी लागू केली, त्यामुळे मॉक पोलिंग झाले नाही.

यानंतर, विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील लढ्याचे केंद्र मारकडवाडी बनले आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

मारकडवाडी ग्रामस्थांनी भाजपच्या राम सातपुतेंना मिळालेल्या मताधिक्यावर आक्षेप घेतला आहे. भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना 843 मतं मिळाली. ग्रामस्थांनी या आकडेवारीवर आक्षेप नोंदवत, "इतके कमी मतदान उत्तम जानकरांना कसे मिळू शकतात?" असा सवाल उपस्थित केला आहे.

यानंतर, मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपर पद्धतीने मतदान चाचणी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने याला विरोध केला आणि हा प्रयत्न हाणून पाडला.

दुसरीकडे, भाजपचे राम सातपुते यांनी मतदानाच्या निकालाचे कारण विकास कामे असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आजच्या दौऱ्यात काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर मविआकडून नेत्यांकडून आणि सामान्य लोकांकडून देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com