Ajit Pawar & Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका -सूत्र

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Prachi Nate

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्याच अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून, या निवडणुकांत भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यामुळे युतीसाठी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्यायही खुला झाला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पवार काका-पुतणे निवडणुकांमध्ये एकत्र दिसणार का? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. युतीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला तर बाजूला सारलं आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याचे संकेतही जवळपास दिल्याचं म्हटलं जाऊ शकतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com