ताज्या बातम्या
NCP Sharad Pawar Protest : पुण्यात शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड सुरु
पुण्यात शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मेट्रो स्थानकावर आंदोलन, पोलिसांची धरपकड आणि मारहाण, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन.
पुणे शिवाजीनगर मेट्रो स्थानकावरील पटरीवर चढून शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पेट्रोलच्या बाटल्या घेत हे आंदोलन केल जात आहे. मेट्रो मार्गावर आंदोलन केल्याने गेल्या दिड तासापासून मेट्रो सेवा खोळंबली आहे.
आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आत मध्ये पोलीस मारहाण करत असल्याची माहिती आहे. तर हे आंदोलन राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी या मागणीकरता केल जात आहे.