जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे  निधन; ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन; ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले.

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी शरद यादव असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ‘पापा नहीं रहे’ अशा स्वरूपाचे ट्विट त्यांची कन्या सुभाषिनी यांनी गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास केले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून स्फूर्ती घेऊन शरद यादव हे समाजवादी चळवळीत सामील झाले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद भूषविले होते. बिहारच्या राजकारणावर त्यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या ‘राजद’शी घरोबा राखायला सुरुवात केली होती. 2002 मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर शरद यादव अनेक वर्षे पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच ते सात वेळा लोकसभेचे खासदारही राहिले आहेत. प्रकृती आणि अनेक कारणांमुळे ते काही काळ सक्रिय राजकारणात दिसले नाहीत. 

शरद यादव जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी सात वेळा खासदार म्हणून काम पाहिलेय. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून लोकसभेवर खासदार म्हणून काम केलं. शरद यादव यांनी १९७४ पासून संसदीय राजकारणात खासदार म्हणून पाऊल टाकलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com