पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सक्स 60,000 हजार पार

पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सक्स 60,000 हजार पार

नवीन वर्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत.

नवीन वर्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 60,800 च्या पुढे तर निफ्टी 18100 च्या पुढे पोहोचला.आज शेअर बाजार उघडताना बीएसई (BSE) सेन्सेक्स 30.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,871.24 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 26.40 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,131.70 वर उघडला आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 995.45 अंकांनी वधारला होता. गेल्या आठवड्यात आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1,35,794.06 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टी 26 अंकांनी वेगाने व्यवहार करत असून त्याच्या 23 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सुरुवातीपासूनच निफ्टीच्या टाटा स्टील, हिंदाल्को, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, ब्रिटानिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टी 26 अंकांनी वेगाने व्यवहार करत असून त्याच्या 23 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com