ठाकरे गटाला मोठा धक्का; युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

ठाकरे गटाला मोठा धक्का; युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

शिंदे सरकार वारंवार ठाकरे गटाला धक्के देत आहेत. अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.
Published by  :
Siddhi Naringrekar

शिंदे सरकार वारंवार ठाकरे गटाला धक्के देत आहेत. अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला अजून एक धक्का बसला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी राजीनामा दिला आहे.

शर्मिला येवले या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय आहेत.मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्या नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितलं.

युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे. यावर बोलताना शर्मिला म्हणाल्या की, युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावलं आहे. युवती सेनेच्या पदाधिकारी मुंबईत बैठकीला जाणार आहेत. मात्र आम्ही राजीनामा देण्यावर ठाम आहोत, असे त्या म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com