India vs Pakistan :  शशि थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे मांडणार दहशतवादाविरुद्ध आपली बाजू; सरकारचा नेमका प्लॅन काय?

India vs Pakistan : शशि थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे मांडणार दहशतवादाविरुद्ध आपली बाजू; सरकारचा नेमका प्लॅन काय?

भारताचा दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश: शशि थरूर आणि सुप्रिया सुळे जगासमोर मांडणार; सरकारची योजना काय?
Published by :
Team Lokshahi
Published on

पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर 'Operation Sindoor' च्या माध्यमातून चोख उत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत पाकिस्तानच्या 9 ठिकाणी दहशदवादी तळांना उद्ध्वस्त केले असून 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष आणि युद्धविराम यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. मात्र आता दहशवादाविरोधी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाची पाऊले उचलले आहे.

यामध्ये केंद्र सरकारतर्फे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली. आता ही शिष्टमंडळे लवकरच जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडतील. प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असणार आहे . हे शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध 'Zero tolerance' चा भारताचे धोरण जगाला समजावून सांगणार आहे.

दरम्यान या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व शशिथरूर, (काँग्रेस) हे करणार असून यामध्ये रविशंकर प्रसाद, (भाजप) संजय कुमार झा, (जेडीयू) बैजयंत पांडा, (भाजप) कनिमोळी करुणानिधी, (डीएमके) सुप्रिया सुळे, (राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP)) श्रीकांत एकनाथ शिंदे, (शिवसेना शिंदे गट )यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे . मुंबईतील 26/11 चा हल्ला असो किंवा इतर सीमापारच्या दहशतवादी घटना, भारताने नेहमीच या कृत्यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे.

यावेळी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी "प्रत्येक महत्वाच्या क्षणी आमचा भारत एकजूट आहे , दहशवादाविरोधी हे शिष्टमंडळ झिरो टॉलरन्स चा संदेश जगापर्यंत पोहचवण्याचे काम करेल असे म्हटले आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारत जगाला दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन करणार आहे. मात्र हे ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करणार आहे. होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com