कल्याणच्या फूल मार्केटमधील शेड एपीएमसीकडून जमीनदोस्त
अमजद खान | कल्याण: कल्याण-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील फूल मार्केटमधील शेड तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार आज पोलिस बंदोबस्तात एपीमसीने शेड पाडण्याची कारवाई केली. या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात एपीमसीने कारवाई केली आहे.
फूल मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या पूनर्विकासाला काही फूल विक्रेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश एपीएमसीला दिले होते. सात दिवसात ही कारवाई करा असे आदेशित केले होते. 15 सप्टेंबर रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर एपीएमसी प्रशासनाकडून त्याठिकाणी विक्रेत्यांना नोटिसा बजावून आज कारवाई केली जाईल असे सूचित केले होते. आज कारवाईकरीता पथक पोहचले असता त्याला फूल विक्रेत्यांनी विरोध केला. काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.
शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की, एपीएमसीने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. ज्या जागेवर फूल विक्रेत्यांचे शेड होते. ती जागा केडीएमसीला दिली आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यात धोकादायक शेड पाडण्याचे म्हटले आहे. मात्र क प्रभाग अधिकारयांनी 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार शेड धोकादायक नसताना सत्ता आणि पैसाचा जोरावरही कारवाई केली जात.