देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता... हे तरी लक्षात आहे का? शीतल म्हात्रेंचे ट्विट
Admin

देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता... हे तरी लक्षात आहे का? शीतल म्हात्रेंचे ट्विट

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते. त्यातच सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असतानाकेंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आणि शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवून पूजत होते. तो उद्धव ठाकरे यांनी दाखवला होता. आयोगाने कागदी धनुष्यबाण जरी मिंधे गटाला दिला असला तरी बाळासाहेब ठाकरेंच्या पूजेतला धनुष्यबाण आमच्याकडेच आहे. असे त्यांनी सांगितले.

Admin

यावर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता... हे तरी लक्षात आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com