Kripal Tumane : "शिवसेनेत फक्त दोनच आमदार राहतील"; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा

Kripal Tumane : "शिवसेनेत फक्त दोनच आमदार राहतील"; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय दावा पुढे आला आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय दावा पुढे आला आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार वगळता बाकी सर्व आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कृपाल तुमाने यांचं आणखी एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे गटाचे बीएमसीमधील तब्बल ऐंशी टक्के आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. दसरा मेळावा पार पडताच या आमदारांचा पक्षप्रवेश घडवून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात मोठा ‘धमाका’ होणार असल्याचं विधान केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना तुमाने यांनीच हा खरा धमाका घडवून आणू, असं सांगत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे. दसरा मेळाव्यानंतर काय खरा राजकीय उलथापालथ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com