CM Eknath Shinde | Devendra FadnavisTeam Lokshahi
ताज्या बातम्या
शिंदे- फडणवीस सरकारचे राज्य शासन कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट, दिवाळी आधीच होणार पगार
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार हा दिवाळीपूर्वीच म्हणजे 21 तारखेला होणार
सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. अशातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालयं आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे. यंदा दिवाळी ही 22 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. या संबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील ट्विट करून माहिती दिली आहे.