Eknath Shinde : महापालिका निवडणुकीबाबत शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde : महापालिका निवडणुकीबाबत शिंदेंची मोठी घोषणा

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता

  • सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता

  • आता ही निवडणुका महायुती म्हणून लढवली जाणार का?

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून विभाग बैठकांचा धडाका सुरू असून, या बैठकांमधून त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्येच लढवल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जीथे आपली जागा भक्कम असेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी देखील भूमिका मांडण्यात येत आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर थेट भाजपावर आरोपच केला आहे, भाजप सर्वांसमोर महायुतीबाबत बोलते, आणि एकंतात स्वबळाचा विचार करते असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता ही निवडणुका महायुती म्हणून लढवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कोण युती आघाडी करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये कोणीही युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे, केलेल्या कामाच्या जोरावर महायुतीच जिंकणार, महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार, पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीला केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळालेली आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलो आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com