ताज्या बातम्या
Shirdi Crime : शिर्डी हादरली; साई संस्थांच्या तीन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू
शिर्डी: साई मंदिराच्या दोन कर्मचाऱ्यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू, एकावर उपचार सुरु
शिर्डीमध्ये पहाटे चार ते साडे पाच दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत. कामावर जात असणाऱ्या तिघांवर अज्ञाताकडून चाकू हल्ला करण्यात आला होता. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर लोणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती शिर्डी साई मंदिरात कर्मचारी होते. सकाळी ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.