Admin
बातम्या
शिर्डी साईबाबा मंदिराला CISF नको; 1 मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक
येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे
येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डीच्या मंदिराला वारंवार धमक्या येत आहेत. शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. यावर साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे.
त्यासाठी १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. नागरिकांनी CISF नियुक्तीला विरोध केला आहे. CISF सुरक्षेला विरोध करण्यासाठी सर्व शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. हिच सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.