Shirur Truck Accident News
Shirur Truck Accident News

Shirur Truck Accident : पुण्यात भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; गाड्यांचा झाला चक्काचूर

Shirur Truck Accident News : या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

पुणे : बाळुमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या करमाळा येथील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. धार्मिक कार्यक्रम उरकून घरी परतत असताना न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली.

या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर (Solapur) येथील रहिवाशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही अपघात एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातात जखमी झालेल्याची नावे

चोपडे (वय ४०)

श्रुती दुर्गडे (वय ३०)

शोभा परमेश्वर महानवर (वय ५५)

मिना वाघमोडे (वय ४५)

सावित्री आशिष पाटील (वय ४०)

रुपाली अण्णा केसकर (वय ३०)

कविता युवराज बोराटे (वय ३५)

अंजली महारनोर (वय ७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com