mohit kambojTeam Lokshahi
ताज्या बातम्या
Video मातोश्रीबाहेर हाय होल्टेज ड्राम : कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला
mohit kamboj यांच्याकडून मुंबई पोलिसांचे आभार
मुंबईत हाय होल्टेज ड्रामा सुरु आहे. राणा दाम्पत्य विरुद्ध (rana )शिवसेना असा सामना रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी (shiv sena)भाजपच्या मोहित कंबोज (mohit kamboj)यांच्या गाडीवर हल्ला केला. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मोहित कंबोज मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मोहित कंबोज यांच्याकडून या परिसराची रेकी होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यावेळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. यामुळे मोहित कंबोज यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.