उद्धव ठाकरेंच्या मस्तकी लावण्यासाठी किल्ले प्रतापगडावरील माती शिवसैनिकांनी दिली भेट

उद्धव ठाकरेंच्या मस्तकी लावण्यासाठी किल्ले प्रतापगडावरील माती शिवसैनिकांनी दिली भेट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या साताऱ्याच्या प्रतापगड किल्ल्यावरील माती साताऱ्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कलशातून भेट दिली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानचा कोथळा याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता.

प्रशांत जगताप, सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या साताऱ्याच्या प्रतापगड किल्ल्यावरील माती साताऱ्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कलशातून भेट दिली आहे.. स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानचा कोथळा याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता..

ती भूमी पराक्रमाची साक्ष असल्याने त्या भूमीतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मस्तकी आणि त्यांच्या चरणी त्या भूमितील माती लावण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पवित्र भूमीतील मातीचा कलश सुपूर्द केला.महाराष्ट्रावर अफजलखानरुपी संकट आले होते.त्याच पद्धतीने राज्यावर केंद्राचे संकट आले असून त्यावर मात करण्यासाठी आई भवानी उद्धव ठाकरेंना ताकद देईल अशी आशा शिवसैनिकांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली.

यावेळी नवनियुक्त सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव,नितीन बानगुडे-पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्रमुख रमेश बोराटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Lokshahi
www.lokshahi.com