शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

यासोबतच ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर राणे यांच्यात लढत होणार आहे. आता महायुतीमधील ठाणे आणि कल्याण जागेबाबतचा तिढा सुटलेला आहे.

शिवसेनेकडून ट्विट करत याची माहिती दिली आहे. आता नाशिक, पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com