अखेर नाशिकचा तिढा सुटला; शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

अखेर नाशिकचा तिढा सुटला; शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता नाशिकमधून शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळाली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला आहे.

या नाशिकच्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरु होती. छगन भुजबळ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा रंगली होती. मात्र अखेर आज हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com