शरद पवार हे एवढे साधे नाहीत, ज्यांना इशारा द्यायचाय त्यांनी तो दिलाय; शिवसेनेच्या आमदाराचा टोला
Admin

शरद पवार हे एवढे साधे नाहीत, ज्यांना इशारा द्यायचाय त्यांनी तो दिलाय; शिवसेनेच्या आमदाराचा टोला

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या आक्रोशामुळे, आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा केली.

याच पार्श्वभूमीवर आता एका माध्यमाशी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला.शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती.

तुम्ही दोन तारखेचा एपिसोड नीट पहिला तर, जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला, तेव्हा याबाबतचा कोणताही तणाव सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी यातून अनेकाचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला. शरद पवार एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर तणाव नाही. त्यावेळी मनात शंका नक्कीच झाली. असे शिरसाट म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com