Palghar : पालघरमध्ये शिवसेना पदाधिकारी 8 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत; तक्रार दाखल
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ चालू झाली आहे. पोलिस त्यांचा तपास करत असतानाच, या संदर्भातील घोलवड पोलीस ठाण्यात तीन संशयीत जणांच्या विरोधात तक्रार देखील दाखल झाली आहे. अशोक धोडी यांचे कुटुंबीय मोठ्या संकटाला सामोरे जात असून पालघर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची सूत्रे अधिक वेगवान केली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व आदिवासी समाज संघटक महाराष्ट्र राज्य जगदीश थोडी यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की,
"या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालेल आहे... तपासाची सुत्र त्यांनी स्वत: हातात घेतलेली आहेत.... त्यांनी सांगितले आहे की, आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत... आणि लवकरात लवकर या केसचा तपास आम्ही पुर्ण करू... आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे... पोलिस ज्या पद्धतीने वेगाने तपास करत आहेत, त्यावरून लवकरात लवकर या केसचा छडा लागेल.. त्यांचा माणूस या ठिकाणी आठ दिवसांपासून नाहीये.... त्यांना सुखरूप त्यांनी घरी आणावा... हिच या ठिकाणी आम्ही पोलिस अधीक्षकांना विनंती केली आहे, असं जयदीश थोडी म्हणाले आहेत.