वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेनेचे आज औरंगाबादेत निदर्शनं

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेनेचे आज औरंगाबादेत निदर्शनं

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. औरंगाबादेत आज वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत. रस्त्यावर उतरुन निदर्शनं केली जाणार आहेत.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादमध्ये दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान, शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यावर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली.हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. अशी त्यांनी सोशल माहिती दिली आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेनेचे आज औरंगाबादेत निदर्शनं
विरोधकांची दहा तोंडे, हेच भाजपचं बलस्थान; शिवसेनेच्या सामनातून विरोधकांना एकत्र येण्यासाठी हाक
Lokshahi
www.lokshahi.com