BMC Upcoming Election : महायुतीत जागा वाटपावरून जुंपणार; शिंदे गटाचा 227 पैकी 100 जागांवर दावा ?

BMC Upcoming Election : महायुतीत जागा वाटपावरून जुंपणार; शिंदे गटाचा 227 पैकी 100 जागांवर दावा ?

गेल्या वर्षी लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत
Published by :
Rashmi Mane
Published on

गेल्या वर्षी लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी सर्व पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीनंही मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली असून महायुतीत शिंदे गटानं 227 पैकी किमान 100 जागांवर दावा केला असल्याचे समजते.

सुप्रीम कोर्टानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील बहुतेक प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजपने काही आढावा बैठका घेतल्या तशा शिंदेसेनेनेही बुधवारी माजी नगरसेवकांची मेगाबैठक घेऊन तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माजी नगरसेवकांची बैठक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जंजिरा बंगल्यावर दोन टप्प्यांत पार पडली. एका बैठकीला 2017 ते 2022 या शेवटच्या टर्ममधील आणि दुसऱ्या बैठकीच त्यापूर्वीच्या माजी नगरसेवकांसोबत एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. दोन्ही बैठकांना मिळून जवळपास 55-60 माजी नगरसेवक उपस्थित असल्याचे समजते.

शिंदे गटाकडे 2017-2022 या टर्ममधील उद्धव ठाकरे गटाचे जवळपास 46 नगरसेवक आहेत. त्यांसह अन्य काही जुने माजी नगरसेवक मिळून साधारण 70-75 संभाव्य उमेदवारांची तयारी शिंदे गटाने केल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com