खरी शिवसेना कुणाची; ठाकरेंची की शिंदेंची? आज सुनावणी

खरी शिवसेना कुणाची; ठाकरेंची की शिंदेंची? आज सुनावणी

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? यावर आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? यावर आज सुनावणी होणार आहे. या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. तर शिंदे गटानं 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं आयोगाकडे सादर केली आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 ला संपतोय. पुन्हा निवडीसाठी परवानगी द्या किंवा हा कायदेशीर पेच संपेपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटानं आयोगात केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केलाय. दरम्यान, संघटनात्मक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे सदस्य आणि इतरही माहिती ठाकरे आणि शिंदे गटाला दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com