ताज्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मालवण बंदची हाक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आज मालवण बंद ठेवण्यात आले आहे. मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मालवणमध्ये 144 लागू करण्यात आलं आहे. जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)