ताज्या बातम्या
Snehal Jagtap Raigad : सुनिल तटकरेंकडून मोठा खुलासा! स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटात प्रवेश?
स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटात प्रवेश ठरला! सुतारवाडी येथे सुनील तटकरेंच्या कार्यालयात बैठक, महाड येथे पक्षप्रवेश कार्यक्रम.
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचे अखेर निश्चित झाले. सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात बंददाराआड सुमारे 2 तास बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते.
14 एप्रिल नंतर दोन दिवसांत पक्षप्रवेशासाठी मुहूर्त ठरविण्यात येणार असून महाड येथे एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. रायगडच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. त्यातच जगताप यांच्या प्रवेशाने तटकरे यांनी गोगावले यांना राजकारणात मात दिल्याचं बोललं जात आहे.