Saamana Editorial : सर्व दहशतवादी हल्ले मोदींच्या काळात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’यातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संपादकीय हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor’च्या निमित्ताने सामनाने केंद्र सरकारवर आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवाद, हुतात्मा जवान, आणि शहीदांच्या कुटुंबीयांप्रती दाखवलेली जबाबदारी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला सामनातून धारेवर धरले आहे.
नेमकं सामना मुखपत्रात काय लिहिले?
“तर दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. सर्व दहशतवादी हल्ले हे मोदींच्या काळात झाले. ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor नावामागे देखील भावनिक राजकारण असल्याचं सामनात म्हटलं गेलं आहे. पाहूयात सामनामध्ये काय म्हटलं आहे ते... उरी, पठाणकोट Pathankot, पहलगामPahalga, पुलवामाचे सर्व दहशतवादी हल्ले हे मोदींच्या काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपाने मत मागितली. पण जे हुतात्मा झाले त्यांना कधीच न्याय मिळाला नाही.
ऑपरेशन सिंदूर या नावामागे देखील भावनिक राजकारण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सिंदूर पुसलेल्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला का? हे शांतिप्रिय मोदींनी सांगावे. मोदींना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. पुरस्कार गळ्यात घालून ते भारतात परततील, पण बहिणीचे पुसले गेलेले सिंदूर त्यांनी आठवावे. सिंदूर रक्षणाकरिता ज्यांनी युद्धाची विमाने उडवली, ते मोदी आता शांतीचे कबूतर उडवतात...” या टीकेमधून ‘सामना’ने भाजपच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या घोषणांना ‘भावनिक प्रचार’ ठरवत, यामागील राजकीय हेतूंवर सवाल उपस्थित केला आहे. लेखाच्या शेवटी, पंतप्रधानांनी शहीदांच्या कुटुंबीयांसाठी काय केलं, याचे उत्तर देणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे.