kirit somaiya
kirit somaiya

'किरीट सोमय्या नालायक माणूस' रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार केल्यानंतर अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत.
Published by :
shweta walge

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी शनिवारी टि्वट करीत आपले नववर्षांचे संकल्प जाहीर केले होते. त्यानुसार या वर्षी (२०२३) मध्ये त्यांच्या टार्गेटवर कोण असणार यांची यादी त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली होती.

रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आम्हाला आतापर्यंत येथे बंगले आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तर सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तर संबंधित ठिकाणी बंगले नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सदर जागेवरील बंगल्यांचे काय झाले? याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांकडे केली आहे.

या प्रकरणावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी किरिट सोमय्यांवर खोचक टीका करत म्हणाले की, “किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. याआधी त्यांनी केलेल्या आरोपांचं काय झालं? किरीट सोमय्या हा लायकी नसलेला माणूस आहे. त्यांनी आधी केलेले आरोप सिद्ध करायला लावा, अशी खोचक टीका सावंतांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

kirit somaiya
ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात

पुढे ते म्हणाले की, तुम्ही हा धंदा आधी बंद करा. त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आणि जे त्यांच्या पक्षात गेले, त्याचे काय झाले? हे तो सांगत नाही. ते जेपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वक्तव्याची दखल मी नव्हे तर कुणीच घेऊ नये, असे माझे मत आहे. ज्यांना आपण नालायक म्हणतो अशी ती लायकी नसलेले माणसं आहेत. त्यांना तुम्ही दत्तक का घेतले हेच मला कळत नाही. तुम्ही दत्तक घेणे बंद करा. सोमय्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, ते सिद्ध करायला लावा, ते तुमच्या लॉंड्रीत कसे स्वच्छ झाले? ते आधी सांगा…, मग दुसऱ्यांवर आरोप करा, अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com