ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख
Admin

ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख

ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले आहे.

ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मिळालाय. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवसेना भवना ऐवजी आता ठाण्यातील आनंद आश्रममधून शिवसेनेचा कारभार सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या नियुक्त्यांच्या पत्रावर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा नवा पत्ता टाकला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढल आहे. या पत्रकात मध्यवर्ती कार्यालयाचा अधिकृत पत्ता ठाण्यातील आनंद आश्रमाचा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com