Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

Shivsena : कल्याण-डोंबिवलीतून आता शिवसेनेला भगदाड; ४० माजी नगरसेवक शिंदे गटात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्केंवर धक्के देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (eknath shinde) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्केंवर धक्के देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.

ठाण्यात (thane) शिवसेनेच्या (shivsena) ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने सेनेकडे केवळ एकच नगरसेवक आहे.

खासदार राजन विचारे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नंदिनी विचारे शिवसेनेबरोबर आहेत शिवसेनेने लोकसभेच्या मुख्य प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती नुकतीच केली.

ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेला भगदाड पडल्यानंतर आता कल्याण- डोंबिवलीतून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण - डोबिंवली महापालिकेतील तब्बल ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: नरेंद्र मोदींनी “ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करावी; त्यानंतरच...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com