Anandrao Adsul vs Navneet Rana
Anandrao Adsul vs Navneet Rana

नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाबाबत अडसूळांचं खळबळजनक विधान; म्हणाले, "चोर रात्रीच्या अंधारात..."

भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही राणा यांना उमेदवारी दिल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.
Published by :

भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही राणा यांना उमेदवारी दिल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणांवर टीका केली होती. आता शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनीही राणा यांच्यावर तोफ डागली आहे. नवनीत राणा नागुपरमध्ये येऊन पक्षप्रवेश करतात. चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाई गडबडीने येतात, असं म्हणत अडसूळ यांनी राणांवर टीका केली.

अमरावतीमधून नवनीत राणांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना अडसूळ म्हणाले, अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करायचं की नाही हे अजून ठरवलेलं नाही. अजून दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण न्यायालयाचा निकाल जाहीर व्हायचा आहे. या निकालावरच सर्वकाही अवलंबून राहील. जे घडायचं असतं, ते कधाही घडू शकतं. त्यांनी घाई केलीय. भाजपात ते कायम राहतीलच असं नाही.

शिवसेनेच्या जागा मिळवण्यासाठी भाजपने खोट्या सर्वेक्षणाचा आधार घेतला, यावर बोलताना अडसूळ म्हणाले, माझ्या बाबतीत शक्यतो असं घडलेलं नाही. या आरोपांबद्दल मलाही कळलं आहे. परंतु, त्यात किती तथ्य आहे, मला माहित नाही. जेव्हा उमेदवारी द्यायची नसते, तेव्हा सर्वेक्षणाचा कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते. यवतमाळ- वाशीममध्ये भावना गवळीच उमेदवार असणार आहे, असंही अडसूळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com