ठाकरे गटाला धक्का; हकालपट्टीनंतर भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का; हकालपट्टीनंतर भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट करत सांगितले. भाऊ चौधरी हे संजय राऊतांचे खास समर्थक म्हणून मानले जात होते.

भाऊ चौधरी यांची हकालपट्टी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाऊ चौधरी म्हणाले की, “नागरिकांच्या काही सरकारकडून अपेक्षा असतात. कामं व्हायला हवी असतात. कार्यकर्ते जेव्हा आमच्याकडे काही कामं घेऊन येत असतात, त्यांची कामं जर झाली नाहीत, तर तो कार्यकर्ता म्हणून लोकांना समाजात जाताना काय सांगेल? गेल्या तीन-चार महिन्यांत एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी जे काही निर्णय घेतले, त्या निर्णयांमुळे प्रभावित होऊन आम्ही शिंदे गटात प्रवेश केला” असे त्यांनी सांगितले.

यासोबतच ते म्हणाले की, “शिवसेनेत गेली ३२ वर्षं मी काम करतोय. शिवसेनेचा गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि डोंबिवलीचा शहर प्रमुख म्हणून काम करत असताना पक्षानं ज्या ज्या ठिकाणी मला जबाबदारी दिली असेल, त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदनं दिली. पण त्यातलं एकही काम मार्गी लागलं नाही”, असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com