MSRTC : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांची पुन्हा नियुक्ती?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबाबतची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयएएस अधिकारी संजय सेठी यांनी MSRTC च्या अध्यक्षपदी निवड केली होती. त्यांच्या नियुक्तीचे राजपत्र आदेशही जारी करण्यात आले. मात्र आता यामध्ये एक ट्विस्ट आला आहे.
MSRTC अध्यक्षपद पुन्हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर सही केल्याची माहिती समोर आली आहे.2014 पासून MSRTC अध्यक्षपद हे परिवहन मंत्र्यांकडेच होते.
मात्र, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटातील मंत्रिपदावरील नाराजी दूर करण्यासाठी भरत गोगावले यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रीपद आल्याने MSRTC अध्यक्षपद शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे.