"ही तर सौगात-ए-सत्ता...", उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा
नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. यानंतर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी हे अधिवेधन खूप निराशाजनक असल्याचे म्हंटले आहे. उद्धव ठाकरे यांनी नक्की काय काय आरोप केले? याबद्दल आपण जाणून घेऊया.
सध्याचे अधिवेशन हे कबरीपासून ते कामरापर्यंत गाजलं. पण नरेंद्र मोदी हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांचे आता 32 हजार कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहेत. पण हे काही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप केले. पण आता हिंदूच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? हिंदुत्ववादी पक्ष आता आहे का? भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं", असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.