ताज्या बातम्या
"लाडक्या बहीणींची मतं त्यांना परत देणार का?", लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला आपत्र ठरवल्याने उद्धव ठाकरेंचा सरकारला प्रश्न
उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत असत. मात्र आता या योजनेमधून पाच लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. जर लाडक्या बहिणीने विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
नंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "अपात्र लाकड्या बहीणींनी पाच लाख महिलांना अपात्र ठरवलं असेल तर त्यांनी दिलेली मतं परत घेणार आहात का? ही त्यांची फसवणूकच आहे".