Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme CourtTeam Lokshahi

सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज महत्त्वाचा दिवस

आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार असण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार असण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.

नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. आज, शुक्रवारी १०:३० वाजेच्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल.

नबाम रेबिया प्रकरणातील मागील घटनापीठाचा निर्णय विचारासाठी मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे का? या निर्णयात बदल किंवा सुधारणा करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने ठरवले तरच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com