“…म्हणून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पुढे ढकलला जातोय; सामनातून टीका

“…म्हणून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पुढे ढकलला जातोय; सामनातून टीका

शिंदे गट आणि ठाकरे गट सध्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट सध्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीकडे लक्ष लागले आहे. धनुष्यबाण कुणाचे आणि पक्ष कोणाचा यावर नेमका काय निर्णय येतो याकडे सर्वाचे डोळे लागले आहे. यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, ही असहिष्णू लोकशाही म्हणजे आपली संस्कृती कधीच नव्हती. महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वारंवार पुढे ढकलला जातोय तो लोकशाहीवरील दबावामुळेच. देशाची न्यायव्यवस्था, कायदे व संसदेसही गुलाम बनविण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्या देशाच्या नसानसांत लोकशाही वाहत असल्याचे सांगणे बकवास आहे.

ही लोकशाही? असा प्रश्न सध्या जनसामान्यांना पडला आहे. मुळात ज्या निवडणूक पद्धतीतून सरकार जन्माला येते त्या ‘ईव्हीएम’वरच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कोणत्या लोकशाहीच्या गप्पा मारल्या जात आहेत?” “मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार पाडले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले. विद्यमान राज्यकर्त्यांना विरोधकांची सरकारे सहन होत नाहीत. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच न्यायमूर्ती निवड प्रक्रियेत सरकारला, म्हणजे भाजपला घुसायचे आहे. अशाने देश रसातळाला जाईल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरिमन यांनी व्यक्त केली. सर्वच राज्यांतील हायकोर्टात संघ विचारांचे लोक खणखणीत वाजवून नियुक्त केले जात आहेत. त्यामुळे न्यायदान क्षेत्राचे काही खरे नाही” असे देखिल म्हटले आहे. “राहुल गांधी हे लोकशाहीच्या रक्षणासाठी चार हजार किलोमीटर चालले, पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये आता सांगितले की, ‘लोकशाही ही हिंदुस्थानच्या नसानसांमध्ये वाहत असून ती आपली संस्कृती आहे.’ मात्र त्याच वेळी देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले, ‘देशात अजिबात लोकशाही उरलेली नाही. मी खासदार आहे, पण संसदेत मला बोलू दिले जात नाही. सरकारसाठी अडचणीचा विषय असेल तर माझा माईक बंद केला जातो.’ गांधी यांचे हे म्हणणे खरेच आहे”, असा उल्लेख देखिल सामनातून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com