धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार - नवनीत राणा

धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार - नवनीत राणा

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात धनुष्यबाण चिन्हावरुन आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत.

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात धनुष्यबाण चिन्हावरुन आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे. धनुष्यबाण चिन्हा कुणाला मिळाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता खासदार नवनीत राणा यांनी एक दावा केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, माझा देवावर, हनुमान चालीसावर विश्वास आहे. बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेसोबत आहे. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा ज्यांच्यासोबत आहेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळेल. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील. असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com