विदर्भात उद्धव ठाकरे गटाला धक्का; 14 पदाधिकारी आज शिंदे गटात

विदर्भात उद्धव ठाकरे गटाला धक्का; 14 पदाधिकारी आज शिंदे गटात

शिंदे सरकार ठाकरे गटाला धक्कांवर धक्के देत आहे. गोंदिया पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे गटातील 14 पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिंदे सरकार ठाकरे गटाला धक्कांवर धक्के देत आहे. गोंदिया पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे गटातील 14 पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी शिंदे गटात जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली जिल्ह्यातील युवा सेनेला हा मोठा धक्का समजला जातो. हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामील होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com